ठाकरे सरकार' मधील काँग्रेसच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज गुरुवारी महिला व बालकल्याण विकास या खात्याचा पदभार स्वीकारला. दोन दिवसापूर्वी त्यांनी वाशीममधील एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केले असून त्या चर्चेत आल्या होत्या. आज त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारत पहिली प्रतिक्रिया त्यांनी मॅक्सवूमनला दिली यावेळी त्यांनी
"महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार नेहमी तत्परतेने काम करत राहील, तसेच महिला आणि बालकल्याण विकासासंदर्भात अनेक योजनांची आखणी सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महिला आयोगाकडे ज्या केसेस प्रलंबित आहेत त्या लवकरच मार्गी लावू असे देखील त्या म्हणाल्या."
यानंतर मॅक्सवूमनचे प्रतिनिधी कविता ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्याबद्दल प्रश्न विचारलं असता
"महिलांना आता ट्रोल करण्याची फॅशन आली आहे, त्याचबरोबर JNUमध्ये गेलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला देखील ट्रोल करण्यात आलं असल्याचा दाखला देत त्यांनी थेट RSS वर टीका करत महिलांना ट्रोल करण्याचा हेडकॉर्टर नागपूर असल्याचं"
त्या बोलल्या.
https://youtu.be/OMtr9-Z5S9o