बबीता फोगाट आता राजकीय आखाड्यात...

Update: 2019-09-18 13:36 GMT

हरियाणाची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबीता फोगाट यांनी काल आपल्या आणि आपल्या कुटूंबाच्या जीवनावर आधारीत लिहिलेल्या ‘आखाडा’ या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशीत केली. या कार्यक्रमादरम्यान फोगाट यांनी आता निवडणूकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सांगितलं.

बबीता फोगाट यांनी म्हटलं की, त्यांनी आता आपली सरकारी नोकरी सोडून राजकारणात पाय ठेवला आहे. राजकारणात राहून त्यांना समाज आणि हरियाणा च्या लोकांची सेवा करायची आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. फोगाट यांना ही प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम आणि राष्ट्रप्रेम पाहून मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच त्यांनी असंही म्हटलं की, “मी एक फाईटर आहे त्यामुळे मी कोणतीही लढाई लढण्यासाठी तयार आहे. आशा मध्ये जर मला हरियाणामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत उतरवले तर मी पुर्णपणे तयार आहे.”

Similar News