कुस्तीपटू बबिता फोगट यांचा भाजपात प्रवेश

Update: 2019-08-12 11:01 GMT

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षांतर वाढलेलं दिसून येते. लोकसभेच्या यशानंतर भाजप पक्ष अधिकाधिक विस्तारत चालला आहे. अनेक मान्यवर व्यक्ती भाजपात दाखल होत आहेत. यामध्ये आता भारताची कुस्तीपटू बबिता फोगट देखील भाजपात दाखल झाली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू ,हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत तिने भाजपात प्रवेश केला.भाजपात प्रवेश केल्यानंतर तिने भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

https://twitter.com/ANI/status/1160814227784970240?s=20

 

 

 

 

 

 

Similar News