गावची सरपंच महिला आहे म्हटल्यावर ‘म्हणजे तिचा नवराच गाव चालवतो...’ असं सहज कुणीही बोलून जातं. पण आम्ही तुम्हाला आज अशा काही महिला सरपांचांची ओळख करुन देणार ज्या फक्त नावापुरत्या सरपंच नाहीत. तर त्यांनी गावचा विकासही करुन दाखवला आहे. मग त्यात स्वत: बारावी पास असुनही गावातील मुलांनी शिकावं म्हणून धडपडणाऱ्या दहेगावच्या सरपंच कविता भोंडवे असोत की, गावाला कोरोनापासून लांब ठेवण्यासाठी स्वत: प्रत्येक घरात जाऊन जनजागृती करणाऱ्या मानेगाव-झबडा ग्रामपंचायतीच्या सरपंच रिताताई सुखदेवे असोत. यांची गावच्या विकासासाठी असलेली धडपड प्रत्येकाला ऊर्जा देणारी आहे.
खमक्या सरपंचताई कविता भोंडवेंची धैर्यगाथा
https://www.maxwoman.in/news-report/work-spirit-of-handicapped-lady-sarpanch-kavita-bhondwe/16665/
महिला आरक्षणाला आता 26 वर्ष झालीत. या काळात महिला नेतृत्वात अनेक बदल झाले आहेत. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या सरपंचताईंनी गावाला एकत्र आणून गावातील कामांचा क्रम कौशल्यानं बदलला. प्रत्येक गोष्ट कशा शिकल्या. भ्रष्टाचार आणि दारूला मूठमाती देताना, त्यांना कोणत्या संकटांना सामोरं जायला लागलं. निरक्षर ते उच्चशिक्षित, प्रत्येकीच्या समोरची आव्हानं वेगळी होती. वाचा पत्रकार साधना तिप्पनाकजे यांचा हा अनुभव...
गावात तक्रार मुक्त रेशन व्यवस्था निर्माण करणाऱ्या मालती सगणे
कोरोनाच्या संकटामुळे ग्रामपंचायत निवडणुका होऊ शकणार नाहीत. त्यामुळे सरकारने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय़ घेतला आहे. पण मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरकारने नेमलेले प्रशासक नियमित येत नसल्याने मुदत संपल्यावरही गावकरी कामांसाठी माजी सरपंच आणि सदस्यांनाच संपर्क साधत आहेत. एप्रिल महिन्यात मुदत संपलेल्या आणि ऑगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच छाया खंदारे आणि सुमन थोरात यांच्याशी संवाद साधला आहे पत्रकार साधना तिप्पनाकाजे यांनी...
कोरोनाला रोखणारं गाव! | corona free village