महिला हॉकी संघाची रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत धडक

Update: 2019-11-03 11:04 GMT

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. या खेळामध्ये महिला देखील आपलं अधिराज्य गाजवत आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने अमेरिकेचा (USA) पहिल्या सामन्यात 5-1 अशा गुणांनी दारुण पराभव केला, मात्र दुसर्‍या सामन्यात भारत 1-4 इतक्या गुणांनी अमेरिकेला पराभव पत्करावा लागला.

परंतु पहिल्या सामन्यातील मोठ्या यशामुळे 2 सामन्यांचे एकूण गुण भारताचे 6 तर अमेरिकेचे 5 झाले. त्यामुळे भारताचा ऑलिम्पिक मधील प्रवेश निश्चित झाला आहे.

सलग दुसऱ्यांदा भारत ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २०१६ मध्ये तब्बल ३६ वर्षांनी भारतीय महिला हॉकी संघ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. आणि आता पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरल्यानं अवघ्या राष्ट्राचे लक्ष या ऑलिम्पिक स्पर्धेकडे असणार आहे.

Similar News