मुंबई पोलिस ग्रेट आहेत ते उगाच नाही. काल शाळा लवकर सुटणार होती आणि व्हॅनला दुसरऱ्या शाळेची मुलं होती म्हणून व्हॅन घ्यायला जाणार नव्हती. एरवी अशी परिस्थिती असली की चार- पाच मुली टॅक्सीने एकत्र घरी येतात. कालही तसंच ठरलं होतं. पण धो धो पाऊस सुरू झाला आणि हिंदमाताला पाणी साचलं. शाळेसमोर कमरेएवढं पाणी भरलं. व्हॅनचा ड्रायव्हर म्हणाला- दुसर्या शाळेला सुट्टी दिलीय, मी मुलींना घेऊन येतो. पण मुलींना याचा पत्ताच नव्हता.
शाळा सुटल्यावर मुली टॅक्सी शोधायला लागल्या. पण त्यांना टॅक्सी मिळेना. मग परेलच्या सिग्नलला जाताना एका महिला पोलिसाने त्यांना थांबवलं. तिने त्यांना आपल्या गाडीजवळ आणलं. आम्हाला फोन लावून दिले आणि टॅक्सी थांबवून त्यांना घरी पाठवून दिलं. अशा अनेक प्रसंगांमध्ये पोलिसांनी आपल्यातलं ममत्व आणि सेवाभाव दाखवला आहे.