पुण्यातील कोथरूड विधानसभा संघात भाजपानं विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले. त्यांच्याऐवजी भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामूळे मेधा कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा रंगतेय. तर दुसरीकडे विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांना शह देण्यासाठी करत असलेले प्रयत्न यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील राजकारण फारचं रंगात आलं आहे.
ब्राम्हण समाजानं चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. तर स्थानिक विरोधकांनी आयात केलेला उमेदवार नको असे फलक जागोजागी लावले आहेत. तर मावळत्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपले दु:ख लपवून प्रत्येकाच्या घरात जाऊन, प्रत्येक जाती धर्मांच्या लोकांना भेटून चंद्रकांत पाटील यांचांच प्रचार करणार असल्याची भूमीका स्पष्ट करत आहेत.