जगातील महासत्ता असलेल्या अमेरिका व चीनमध्ये सध्या व्यापाराच्या मुद्द्यावरुन त्यांच्यातील संबंध तनावाचे बनले आहे. या तणावपूर्ण वातावरणाला कारणीभूत एक महिला असून या महिलेमुळे तिसरे महायुद्ध होतेय की, काय अशी चिंता जगाला लागली आहे. ती महिला अजून कुणी नसून चीनमधील सर्वात मोठी मोबइल कंपनी हुवेईच्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) मेंग वानझोउ आहे. अमेरिका व चीन यांचे व्यापारी संबंध बिघडल्याने दोन्ही देशांनी एकमेकांच्या अनेक वस्तूंवर आयात शुल्क वाढविले आहे. याच दरम्यान अमेरिकाने राष्ट्रीय सुरक्षाचे कारण समोर करत जगातील सर्वात मोठी कंपनी हुवेई जी चीन या देशातील सर्वात मोठी कंपनी आहे तिला बॅन करून टाकणे.
ही घटना आगीत तेल टाकणारी ठरली आहे. हुवेई कंपनी चे नेतृत्व मेंग वानझोउ करत असून त्या कंपनीचे संस्थापक रेन झेंगफेई यांची मुलगी आहे. रेन झेंगफेई यांचे संबध चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्याशी मधुर असल्याने अमेरिकेच्या हुवेई कंपनीला बॅन करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चीन पलटवार कारवाई करणाऱ असल्याच्या इशारा दिल्याने विश्व स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मेंग वानझोउ यांच्या मुळे याआधी अमेरिका आणि चीन एकमेकांविरोधात भिडले होते. काही दिवसांपूर्वी कॅनेडामध्ये मेंग वानझोउ यांना अटक झाली होत. ही अटक अमेरिकेच्या इशाऱ्यावर झाल्याचा चीनचा आरोप असल्याने आता मेंग वानझोउच्या हुवेई कंपनीला बॅन केल्याने चीन अमेरिका संबंध तुटले आहेत, त्यामुळे ही चीनी महिलाच तिसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरण्याचे जागतिक स्तरावर अभ्यासकांकडून बोलले जात आहे.