आताचे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ न मिळाल्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या प्रमुख पदी लवकरच नवा अधिकारी नियुक्त होईल. या पदासाठी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावांची चर्चा आहे. जर आयुक्त पदी रश्मी शुक्ला यांची निवड झाली तर त्या पहिल्या महिला आयुक्त ठरणार आहेत. याआधी त्या पुणे पोलीस आयुक्त पदी होत्या. ३१ ऑगस्ट रोजी बर्वे यांचा कार्यकाळ संपत असून बर्वे यांची पोलीस आयुक्तपदी मुदतवाढ द्यायची की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत.