भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) आपल्या क्रिकेट करियरपेक्षा पत्नी हसीन जहॉं (Hasin Jahan) हिने केलेल्या आरोपांमुळेच अधिक चर्चेत राहिला आहे. हसीन जहॉंने शमीवर आतापर्यंत मॅच फिक्सींगपासून घरगुती हिंसाचारापर्यंत अनेक आरोप केले आहेत. यावेळी तीने एक न्युड फोटो शेअर करताना सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का दिलाय.
हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना हसीन जहाँने पुन्हा एकदा मोहम्मद शमीवर निशाणा साधला आहे. “काल तू काहीच नव्हतास तेव्हा मी शुद्ध होती. आज तू काहीतरी झाला आहेस त मी अशुद्ध झाली. असत्याचा पडदा टाकून सत्य लपवलं जाऊ शकत नाही. मगरीचे अश्रू काही दिवसांसाठीच सोबत देतात,” असं तीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.