सरोगसी हा ज्यांना स्वतःचं मुल हवंस असतं अश्या जोडप्यांना उपयोगी ठरु शकेल. बदलत्या जीवनशैली नुसार मुल होण्याचे अनेक प्रश्न तयार झाले आहेत.त्यातील काही शारीरिक तर काही सामाजि्क आहेत. त्यामुळे सेरोगसी चा जन्म झाला व तो खुप मोठ्या प्रमाणावर फोफवला. यात सरोगसीचा करार करणा-या महिलांना लुबाडण्याचे प्रकार जास्त आहेत कारण याबद्दल चा कुठलाही कायदा अस्तित्वात नाहीये. या बरोबरच या विधेयकात महिलांना स्वतःच्या शरिरावर अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे हे विधेयक हे महिला सबलीकरणाचा पाठपुरावा करणारे असल्याने महिलांना याचा नक्कीच उपयोग होईल असे मत रिटा बहुगुणा जोशी यांनी लोकसभेत मांडले.