आमचा आवाज दाबणं इतकं सोपं आहे का?; झायरा वसीमचा मोदींना सवाल

Update: 2020-02-05 11:09 GMT

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्यातील नेत्यांना नजरकैदेत ठेवतं काही बंधन घातली होती. इंटरनेट वापर हा मुलभूत अधिकार असताना काश्मीरमध्ये इंटरनेटसह इतरही सेवांवर निर्बंध आणले गेले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे. या सर्व परिस्थितीवरून ‘दंगल’ गर्ल झायरा वसीमनं मोदी सरकारला सवाल केला आहे. झायरा वसीमने आपल्या अधिकृत इस्टाग्रामवरून एक पोस्ट करत काश्मीरमधील सद्य परिस्थितीची कैफियत या पोस्टमध्ये मांडली आहे.

“आशा आणि निराशेच्या गर्तेत काश्मीरी माणूस दुःख भोगतोय आणि पाहतो आहे. शांततेच्या ठिकाणी असत्य व निराशा वाढत आहे. आपल्या स्वातंत्र्यावर सहज बंधन घालणं जगात जिथं सोपं आहे, अशा ठिकाणी काश्मीरी आपलं आयुष्य जगत आहेत. जिथे आपलं जीवन, इच्छाशक्ती नियंत्रित केली जात आहे.

जगण्यावर अंकुश ठेवला जात आहे, अशा ठिकाणी आम्ही का जगत आहोत? आमचा आवाज दाबणं इतकं सोपं का आहे? आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपून टाकणं इतकं सोपं का आहे? आमच्या इच्छेविरूद्ध घेण्यात आलेल्या निर्णयांवर आम्ही आमची मते मांडण्याचं स्वातंत्र्य का नाही? असंख्य वेळा आमचे आवाज दडपून टाकणं इतकं सोपं आहे काय? काश्मीरमधील परिस्थितीवरून अभिनेत्री झायरा वसीमने असं झायरानं म्हटलं आहे.

Similar News