आंतरराष्ट्रीय पातळीवर (gold) सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यानं तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्यानं (gold) सोन्याचे भाव प्रति तोळा 43 हजार रुपयांवर गेले आहेत. तर चांदी किलोमागे 49 हजारांवर पोहचली आहे.
सोने चांदीचे विक्रमी भाव वाढत असल्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक मंदी त्यात आणखी भर म्हणून चीन मधील कोरोना व्हायरस तसंच अमेरिकेच्या डॉलर च्या तुलनेत रुपयाचं सातत्याने होणारं अवमूल्यन ही कारणं आहेत.
गेल्या चार दिवसापूर्वी सोन्याचा भाव प्रति तोळा 41 हजारांवर होता. मात्र डॉलरची किंमत भारतीय रुपयाच्या तुलनेत 75 पैश्यांनी वाढली आणि सोन्याच्या भाव आणखी वाढले.
या संदर्भात आम्ही जळगावच्या सोनेव्यापाऱ्य़ांशी चर्चा केली असता, त्यांनी लग्नसराई सुरू असल्याने हा भाव आणखी वाढून 45 हजारांपर्यंत पोहचेल असा अंदाज व्यक्त केला आहे.