यासाठी पाठवलं का सभागृहात?

विधिमंडळाचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. याच अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या अशा शक्ती कायद्याचे विधेयकही मांडण्यात आले. मात्र विधिमंडळाच्या सभागृहात तीन महिला मंत्री वगळता इतर महिला सदस्य बोलल्या नाहीत. त्यामुळे यासाठी पाठवलं का सभागृहात? असा प्रश्न विचारण्याचा वेळ आली आहे.

Update: 2020-12-19 12:30 GMT

विधिमंडळाचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. याच अधिवेशनात महिंच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या अशा शक्ती कायद्याचे विधेयकही मांडण्यात आले. मात्र विधिमंडळाच्या सभागृहात उपसभापती व तीन महिला मंत्री वगळता एकही महिला सदस्य बोलल्या नाहीत. त्यामुळे यासाठी पाठवलं का सभागृहात? असा प्रश्न विचारण्याचा वेळ आली आहे.

निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील जनचेते प्रश्न मांडणे. विविध योजनांसदर्भात सरकारला प्रश्न विचारणे, हा अधिवेशना मागचा उद्देश असतो. पण आता या अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नांऐवजी फक्त राजकारण दिसू लागलं आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर समजल्या जाणाऱ्या शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्यात आले. मात्र महिलांसाठी असलेल्या या विधेयकार महिलांनाच त्यांची मतं मांडण्यापासून डावलण्यात आले.

सध्या विधानसभेच्या सभागृहात एकूण 24 महिला सदस्य आहेत. तर परिषदेच्या सभागृहात फक्त दोनच महिला सदस्य आहेत. यापैकी उपसभापती निलम गोऱ्हे, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री आदिती तटकरे, मंत्री वर्षा गायकवाड ही नावं वगळता इतर कोणत्याही महिला सदस्यांना त्यांची मत मांडता आली नाहीत.

मंत्री यशोमती ठाकूर, आदिती तटकरे, वर्षा गायकवाड यांनी सभागृहात फक्त पुरवणी मागण्या मांडल्या तर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव, डिसले गुरुजींच्या अभिनंदन प्रस्तावावर आपली मतं मांडली. त्या व्यतिरीक्त काही नाही.

यासंदर्भात मॅक्स वुमनने सर्व महिला आमदारांना संपर्क साधून त्यांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया....

मंदा म्हात्रे, आमदार, भाजपा

"दोन दिवसांच्या अधिवेशनात बोलायला संधी कशी मिळणार? त्यात माझी तब्येत बरी नसल्याने दोन्ही दिवस मी हजेरी लावून थोडावेळ बसून गेले. पहिला दिवस तर शोक प्रस्तावात आणि विधेयकं मांडण्यात गेला. दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या नंतर आम्हाला बोलायला 4 तास आणि सत्ताधाऱ्यांना बोलायला 2 तास दिले. त्यातच रात्र झाली 8/9 वाजले. दोन दिवसांत बोलायला कसं मिळेल? उगाचंच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून उपयोग नाही. ते मला आवडत नाही आणि पटत पण नाही. हा जर आठ दिवस, चार दिवस अधिवेशन असतं आणि त्यावेळी आम्हाला बोलायला नसतं मिळालं तर काही तरी वाटलं असतं. पण दोन दिवसांत बोलायला वेळच नाही ना, त्यात मी आजारी आसल्याने दुपारी दोननंतर सभागृहातून निघायची. दुपारनंतर काय झालं हे मला माहिती नाही. मला माहिती होतं की बोलायला मिळणारच नाही तर थांबून काय करणार ना? त्यामुळे उगाचंच सरकारला बोलून काय फायदा.."

मनिषा चौधरी, आमदार भाजपा

"अधिवेशनाचे दोनही दिवस सकाळपासून ते राष्ट्रगीतापर्यंत मी सभागृहात होते. फक्त दोन दिवसांचे अधिवेशन, त्यात फक्त शोक प्रस्तावावर मी बोलले, त्यानंतर पुरवणी मागण्या होत्या. त्या संबंधित मंत्र्यांनी मांडल्या. त्यानंतर बोलायला आम्हाला 4 तास आणि सत्ताधाऱ्यांना 2 तास इतकाच वेळ होता. मग वेळच नसल्याने आम्ही बोलणार कधी? त्यासाठीच आम्ही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत होतो."

मुक्ता टीळक, आमदार भाजपा

"एकतर अधिवेशन कमी कालावधीसाठी होतं. त्यामुळे महिलांना संधी मिळाली नसेल. आमचे मुद्दे आणि प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आधीच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी सांगत होतो. जेणे करुन प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळेल. कोरोना, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मांडण्यासाठी बोलताला येइल. परंतू हे अधिवेशन गुंडाळलं गेलं. बरेच विषय होते आणि ते दोन दिवसांत संपणारे नव्हते. त्यामुळे कमीत कमी आठ दिवस तरी अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं. यातून सत्ताधारी पक्षाला विषयांचा आणि प्रश्नांचा सामना करायचा नाही असं दिसतंय."

लताबाई सोनवणे, आमदार शिवसेना

यासंदर्भात शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे यांनी उचलला. "मी त्यांचा मिस्टर बोलतोय Ex आमदार" त्यांनी असं सांगीतलं. यावर लताबाई यांची प्रतिक्रीया हवी असल्याने त्यांच्याकडे फोन देण्याची विनंती केली असता चंद्रकांत यांनी "नाही त्यांची नाही मिळणार" असं म्हणून फोन कट केला.


सरोज अहिरे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

"माझं नाव पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी होतं, पण बोलायला वेळच कमी असल्याने ते शक्य झालं नाही. संधी नाही मिळाली तर हरकत नाही, आम्ही लेखी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तारांकीत प्रश्न टाकलेले आहेत. माझं नाव घेतलं होतं पण विरोधी पक्षाच्या 4 तास आम्हीच बोलणार या आडमुठेपणामुळे ते शक्य झालं नाही."


आदिती तटकरे, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस

या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन 'नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर' असल्याचं सांगीतलं. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.


सुमन पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

या संदर्भात सुमन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवु शकला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.


सुलभा खोडके, आमदार, काँग्रेस

या संदर्भात सुलभा खोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

या संदर्भात वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

एड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री

या संदर्भात यशोमती ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

प्रतिभा धानोरकर, आमदार काँग्रेस

या संदर्भात प्रतिभा धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

प्रणिती शिंदे, आमदार काँग्रेस

"मुळात वेळच कमी होता. आम्ही बोलण्याची तयारी केली होती. पण विरोधी पक्षाने सगळा वेळ घेतला. सभागृहाचे स्पीकर सर्वांना वेळ नाही देऊ शकत."

विद्या ठाकूर, आमदार, भाजपा

"अधिवेशन दो दिन का था. सरकार अगर एक दिन भी बढाती तो हम बोल सकते थे. इसलिये पुरवनी पे भी कोइ बोल नही पाया. सरकार अधिवेशन को लेकर सिरीयस नही दिखती. वो अगर कोरोना का प्रिकॉशन लेकर 6 दिन का रखते तो महिलाएं बोल सकती थी."

देवयानी फरांदे, आमदार, भाजपा

या संदर्भात देवयानी फरांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

मेघना बोर्डीकर, आमदार, भाजपा

या संदर्भात प्रतिभा धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

श्वेता महाले, आमदार, भाजपा

"अधिवेशन केवळ एकच दिवस होते. एक दिवस शोकप्रस्ताव होता त्यामुळे कामकाज झाले नाही. राज्यामध्ये पन्नास टक्के महिला आहेत, अशावेळी अधिवेशनाचा कालावधी वाढवून महिलांवरील प्रश्नांसाठी वेळ देणे गरजेचे होते. परंतु केवळ पुरवणी मागण्या मंजूर करणे एवढाच अधिवेशनाचा उद्देश होता. कोणत्याही महिला आमदाराला स्वतःच्या मतदारसंघातील समस्या मांडायला वेळच मिळाला नाही हे दुर्दैवी आहे ...लोकशाहीला पोषक नाही"

माधुरी मिसाळ, आमदार भाजपा

या संदर्भात प्रतिभा धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

नमिता मुंदडा, आमदार, भाजपा

या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

मोनिका राजळे, आमदार, भाजपा

या संदर्भात मोनिका राजळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

सीमा हिरे, आमदार, भाजपा

या संदर्भात सीमा हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमचा प्रश्न ऐकुन घेतला आणि फोन ठेवला. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

मंजुळा गावीत, अपक्ष, आमदार

या संदर्भात मंजुळा गावीत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

गीता जैन, अपक्ष आमदार

या संदर्भात गीता जैन यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांना मेसेज केला मात्र त्याला सुध्दा उत्तर आलेलं नाही. आल्यास बातमीमध्ये अपडेट करु.

या महिलांनी दोन दिवसांच्या कालावधीचं बोलायला मिळणं शक्य नव्हतं अशी कारणं दिली असली तरी त्या एक आमदार आहेत आणि आमदारांनाच जर आपले प्रश्न माडता येत नसतील तर सामान्य स्त्रियांची काय परिस्थिती असेल याचा तुम्ही विचार करा..

यासंदर्भात आम्ही सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांना संपर्क साधला तेव्हा,

"महिला आमदारांनी जागरुक असलं पाहिजे. इथे संधी मागण्याचा संबंध न राहता उलट त्यांनी आग्रहाने आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. आणि तेव्हा तर बोलायची संधी दिली नाही तर म्हणता येइल डावललं जातंय. त्यामुळे आम्ही काय बोलणार या उत्तराला काही अर्थ नाही. तुम्ही एका मोठ्या विभागाचे प्रतिनिधी आमदार म्हणून आलेले आहात. तुम्ही जर एथॉरिटी असाल तर तुम्हाला डावलण्याचा संबंधच येत नाही. या महिला आमदारांनी जास्त क्रियाशील असण्याची अपेक्षा आहे. स्त्रिया या सक्रिय राजकारणात फक्त नामधारी आहेत का? असं वाटण्याइतका त्यांचा मुकेपणा खटकणारा आहे."

कोरोनामुळे हे अधिवेशन दोन दिवसांत आटपण्यात आले असले तरी भविष्यात भविष्यात अधिवेशनाचा कालावधी कमी झाला तरी महिला आमदारांनी कमी कालावधीचे कारण न देता आपले मुद्दे, प्रश्न ताकदिने मांडणे गरजेचं आहे.

Tags:    

Similar News