'या' सामान्य महिलेचा आवाज कोण ऐकणार?

Update: 2019-10-15 12:12 GMT

नागपूर मधील रामभागाच्या अवस्थेकडे मुख्यमंत्री लक्ष देत नसल्याचा आरोप तेथील स्थानिक रहिवासी संगिता लोंढे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनण्याआधी रामभाग येते मिटींग घेतली होती. त्यानंतर ६ वर्षे होऊन गेले पण मुख्यमंत्री रामभागाची अवस्था पाहायला आले नाही. या भागातील वॉर्ड मेंबर विजय चुटले यांनी देखील या भागातील बिकट अवस्थेकडे दुर्लक्ष करत आहेत.

संगिता लोंढे म्हणाल्या की, गेली २० वर्षे मी येथे राहत आहे. या भागात नळाची सोय नाही, गटरांची सोय नाही. कोणत्या योजना आमच्या पर्यंत पोहचत नाहीत.

नेते फक्त मत मागण्यसाठी येतात आणि निवडून आल्यानंतर लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी केली आहे.

Full View

Similar News