कोण आहेत आमदार दिपिका चव्हाण…

Update: 2019-07-09 12:05 GMT

गृहिणी असतानाच अचानक राजकीय विश्वात उडी घेऊन राजकारण ढवळून काढणे तसेच समाजातील प्रश्न जिद्दीने सोडवणे भल्या-भल्यांना शक्य होईलचं हे सांगता येणार नाही. मात्र हे शक्य केलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बागलाण मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार दिपिका चव्हाण यांनी… राजकीय घराण्यात लग्न करुन आल्यानंतर कधीही असं वाटलं नाही की आपल्यालाही राजकारणात सक्रीय व्हावं लागेल. पण आयुष्यात कधी कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागेल याची शाश्वती नसते.

कधी ध्यानीमनी नसताना अचानक निवडणुकीला सामोरे जावे लागेल असं वाटलंही नव्हतं. पण अचानक आलेल्या संधीमुळे आमदार म्हणून समाजातील लोकांसाठी काम करायला मिळालं याचं समाधान वाटतं असं आमदार दिपिका चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Similar News