डॉ. नीलम गोऱ्हे कोण आहेत?

Update: 2019-06-24 12:41 GMT

डॉ. नीलम गोऱ्हे मूळच्या पंढरपूरच्या ... व्यवसायाने वैदकिय सामाजिक कार्यकर्त्या... हळूहळू सामाजिक कार्यापासून सुरू झालेला प्रवास राजकारणात येऊन पोहचला. राजकारणात सतत सक्रिय राहणं... महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवत त्यांची मदत करणं हा नीलम गोऱ्हे यांचा स्वभाव... प्रत्येक काम जिद्दीने आणि न्यायपूर्वक करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती पदी निवड झाली आहे. त्यांची ही निवड बिनविरोध झाली असून विरोधी पक्षांनी त्यांचं अभिनंदन केल आहे.

नीलम गोऱ्हे यांची महत्वाची कामे

महाराष्ट्रातील ५००० पेक्षा अधिक कुटुंबे व महिलांना कायदेशीर मदत, सल्ला मार्गदर्शन, समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणे. घरगुती हिंसाचार, बलात्कार, छळ अशा विषयांमध्ये महिलांच्या मदत गटांची स्थापना नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. स्त्री आधार केंद्रामार्फत न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्य आणि सक्रीय सहकार्य देखील करत असतात.

Similar News