My CKP Moment म्हणजे नेमंक काय? ज्यामुळे सुप्रिया सुळे ट्रोल झाल्या

Update: 2020-09-03 09:01 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका फोटोला माय सीकेपी मोमेंट हे कॅप्शन देत ट्वीट केलं आणि त्यानंतर त्यावर नाराजीचा सूर उमटला. हा फोटो होता त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देऊन तेथील गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले तेव्हाचा. या फोटोत पती सदानंद सुळे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, वरुण सरदेसाई आणि शौनक पाटणकर आहेत. पण सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांची संपुर्ण नावं न देता फक्त आडनाव पोस्ट केली आहेत. या वरूनच नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केलं आहे.

ट्विटवर प्रतिक्रिया देणारे अरविंद जोशी म्हणतात, "आपल्या जातीचा उल्लेख अभिमानाने करणे हे लोकप्रतिनिधींना शोभत नाही. जातीअंत केवळ भाषणांपुरताच बोलण्यासाठी आहे का? आपल्या वडिलांनी 'मी मराठा आहे,' असा उल्लेख कधीही केला नाही."

प्रितीश साठे म्हणतात, "विदर्भ पाण्याखाली असताना तुम्ही मराठा, सीकेपी, दलित, ब्राह्मण करत बसा. हे पुरोगामी महाराष्ट्रात कसे चालते?"

वर्षा राजपूत म्हणतात, "वैयक्तिक फोटोला जातीयवादी स्वरूप देणे योग्य वाटत नाही."

"असं करून तुम्ही जातीयवादाला खतपाणी खालत आहात असं नाही का वाटतं," असा सवाल राज कदम यांनी विचारला आहे.

CKP म्हणजे काय?

CKP म्हणजेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. हा समुह ब्रांम्हण समुहाशी काहिसा मिळताजुळता असल्याचं म्हटलं जातं. विवीध धार्मीक विधी, वेदांचा अभ्यास, वेदिक विधीही या समुहाकडून केले जातात.

दरम्यान या विषयावर आता सुप्रिया सुळे यांनी सारवासारव केली असून CKP चा म्हणजे काइंड हार्टेड प्लाटून असं उत्तर दिलं आहे.

Similar News