महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत 'सावित्री ज्योती' ही मराठी मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून २६ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतेय. मात्र दुसरीकडे पॉर्न, विवाहबाह्य समंध दाखवणाऱ्या मालिका, शिव्या आणि अश्लिलतेचा भरपूर मसाला असलेल्या वेजसिरीज पाहाणाऱ्यांच्या संख्येत झापाट्याने वाढ होतेय.
नॅशनल सेंटर फॉर मिसिंग एड एक्सप्लोइटेड चिल्ड्रन (NCMEC) च्या आकडेवारिनुसार लहान मुलांचे पॉर्न व्हिडीओ, बलात्काराचे व्हिडीओ सर्वात जास्त भारतात अपलोड होतात. 2020 सुरुवातीच्या पहिल्या फक्त 5 महिन्यांत 25,000 पेक्षा अधिक फोटो व्हिडीओ भारतातून अपलोड करण्यात आले आहेत.
यात दिल्ली चा पहिला क्रमांक लागतो तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकरणांतील गुन्हेगारांमध्ये पीडिचेच्या घरातील व्यक्ती नातेवाइक असण्याचे प्रमाण 70 टक्के आहे.
त्यामुळे लोकांची 'चव' बदलतेय का? लोक नक्की काय बघतात? हा प्रश्न पडतो..
यासंदर्भात आम्ही चित्रपट, मालिका व सामाजीक चळवळितील तज्ज्ञाकडून त्यांची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला..
-हेमंत ढोमे, दिग्दर्शक
"लोकांच्या टेस्ट बद्दल बोलायचं झालं तर आज प्रत्येकाच्या घरात टिव्ही आहे. तो एक कुटुंबासोबत पाहाण्याचा प्रकार आहे. पण एका वेळेनंतर आपण स्वत:ची पर्सनल स्पेस शोधायचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येकाला एका ठराविक वयानंतर तरुण मुलगा आणि त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेली महिला यात रस वाढत जातो."
"या OTT माध्यमांवर प्रेक्षकांची सख्या वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिथं नसलेलं सेन्सॉर.. TV किंवा थेटरमध्ये जे किसींग सिन पुरत मर्यादीत असतं ते या माध्यमांवर बेड सिन पर्यंत लोकांना पाहायला मिळतं."
"प्रेक्षकांचे सुध्दा नाटक चित्रपट पाहाण्याचे स्वत:चे असे ठोकताळे आहेत. नाटकात काय बघायचं आणि चित्रपटात काय बघायचं. उद्या जर नाटकात किसींग सिन दाखवला तर अरे बापरे हे काय दाखवता असं लोक म्हणतील पण तेच जर चित्रपटात दाखवलं तर चलता है म्हणून आपण सोडून देतो."
"त्यामुळे असे उत्तम कथानकाचे चित्रपट येतील पण त्याचा प्रेक्षक वर्ग हा मर्यादीत आहे."
प्राध्यापक हरी नरके, संशोधन सल्लागार "सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती"
"माझा रोष वाहिनीवर नाही तर या समाजावर आहे. फुले-शाहू- आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणाऱ्या महाराष्ट्र्च्या बहूजन समाजाने सावित्री आणि ज्योतीरावांचं जिवन कार्य बघितलं पाहिजे. आपण आपल्या पुर्वजांच्या खांद्यावर उभे आहोत. त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे असं का नाही वाटत बहूजन समाजाला. माझा रोख स्त्रीयांवर, बहूजनांवर, अल्पसंख्यांकावर आहे. (अल्प संख्यांक म्हणजे फुले परंपरेवर फार जास्त बोलणारे) ते सुध्दा या विषयावर का नाही बोलत? ते काही नाही ही मालिका बघत? मी समाजाला ब्लेम करतो."
वैभव छाया, फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते
"निर्मात्यांनी आपले पैसे गुंतवून ही मालिका उभि केली. याच्या मागे खुप सारा पैसा लागतो. त्याशीवाय स्वतंत्र ऐतीहासिक काळ उभा करता येत नाही. यात निर्मात्यांनी कुठेही ऐतीहासिक तथ्यांना धक्का लावलेला नाही. पण आता लोकांच्या मनात आपल्या महामानवांबद्दल जराही कृतज्ञता नाही. त्यामुळे थिल्लर कंटेंट बघण्यासाडे लोकांचा कल जास्त आहे. या मालिकेत उत्सुकता ताणून धरणाऱ्या गोष्टी नाहीत अशातला ही विषय नाही."
"शेवटी हा TRP चा खेळ आहे. मध्यंतरी TRP चा घोटाळा समोर आला पण TRP चे जे काही खरे खोटे आकडे असतील ते ठरवतात एखादी मालिका सुपरहीट आहे की फ्लॉप आहे. पण TRP च्या आकड्यांवर किती विसंबून रहायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे TRP मोजण्याचं प्रमाण आता बदललं पाहिजे."
"लोकांना पॉर्न, विवाहबाह्य समंध हे पाहायला लोकांना आवडतंय. बेजबाबदार राजकारण्यांमुळे देशच मागास होत चालला आहे. त्यामुळे अशा लोकांकडून प्रबोधन समजून घेण्याची आपण अपेक्षाच करु शकत नाही."
६ जाने. २०२० रोजी या मालिकेला सुरुवात झाली. माणसाला निखळ करमणुकीची गरज असते. त्याच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्या , रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्याय सावित्रीजोतीसारख्या मालिकाही आवश्यक आहेत.
शरमेची बाब ही की कलेचे उपासक व स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात हे घडतंय. आपण ज्या शाहू-फुले- आंबेडकरांचा वारसा सांगतो त्याच फुलेंच्या जिवनावर आधारीत मालिकेवर हि वेळ येणं म्हणजे महाराष्ट्राच्या दिखावू पुरोगामीत्वाचं केलेलं वस्त्रहरण आहे.