हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. हैदराबाद पोलिसांच्या या कामगिरीनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. यावर समाजातील विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावर प्रत्येकजण 'न्याय मिळाला' अशी समान भावना करताना दिसत आहे. फक्त सामान्य माणूसच नाही तर राजकीय नेत्यांनी देखील या निकालाबद्दल प्रतिक्रिया दिल्या. यावर मनसे महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा आणि मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी
"हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत , हा न्याय त्वरित झाल्याबद्दल आनंद आहे. या न्यायामुळे अश्या विकृत वृत्तीच्या लोकांना एक भीती निर्माण होईल एक महिला म्हणून मी या निर्णयाचे अभिनंदन करते"
अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली.
https://youtu.be/Qs4vp-2_7Wk