‘माझ्याकडून नक्की काहीतरी चूक झाली असेल म्हणून…’ महापौरांनी शेअर केला व्हिडीओ

Update: 2020-09-15 14:45 GMT

महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांसमोर जोडत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी ‘‘मास्क न वापरता घराबाहेर पडू नका. माझंच पाहा, माझ्याकडून नक्की काहीतरी चूक झाली असेल. म्हणून मला कोरोनाचा विळखा पडला. तुम्ही मात्र असं करू नका." असं म्हटलं आहे.

महापौर सध्या कोरोनावर उपचार घेत असून उपचारादरम्यान, हॉस्पिटलमधून त्यांनी मुंबईकरांसाठी हा व्हीडीओ पोस्ट केला आहे. ‘कुठेही जा, बाजरात जा पण मास्क घाला. विनाकारण घराबाहेर पडू नका.’ असं आवाहन पेडणेकर यांनी मुंबईकरांसाठी हॉस्पिटलच्या बेडवरून केलं आहे. दरम्यान, आता महानगर पलिकेने मास्क न वापरणाऱ्यांवर 200 रुपये दंड आकारला जाणार असल्याचं म्हटलं आहे.

 

Full View

Similar News