राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना पक्षात महत्त्वाचं स्थान मिळालं. विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी रुपाली चाकणकर यांची इच्छा होती. मात्र, या ठिकाणी नगरसेवक सचिन दोडके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचा पत्ता कट झाला आहे.
खडकवासला मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना तिकीट दिलं आहे. तापकीरांना पराभवाची धूळ चारण्याची चाकणकरांची इच्छा होती, मात्र ती इच्छा अपूर्ण राहिल्यानं रुपाली चाकणकर पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.