राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी भाजप सोबत जात उपमुख्यंत्री पदाची शपथ घेतली. राज्याच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे अशी टीका काँग्रेसने केली. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी ही संविधानाची तोडफोड आहे, राष्ट्रपती राजवट काढून रात्रीत अश्या गोष्टी होतात का ? हा सर्वच धक्का आहे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
https://youtu.be/HDaygvWl79Y