एकीकडे सरकारचा बेटी बचाव बेटी पढाव असा नारा देत असताना वाशीम जिल्यातील जऊळका रेल्वे येथील शेतकरी दत्ता लांडगे यांच्या विधवा पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. शेतकरी दत्ता लांडगे यांच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांच्या पत्नीस मानधन मदत म्हणून दरमहा सात हजाराची दिलेली नोकरी प्रशासनाने काढून घेतली. यामुळे लहान मुलांचं संगोपन आणि कुटुंबाची आलेली जबाबदारी कशी करायची असा प्रश्न समोर असताना त्यांनी प्रशासनाकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.
दरम्यान दत्ता आत्माराम लांडगे यांनी १० सप्टेंबर २०१५ ला मुख्यमंत्र्यांच्या नावे पात्र लिहून आत्महत्या केली होती. या पात्रात त्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे असं नमूद केलं होतं .