वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. अशी मान्यता आहे कि , ह्या व्रताने पती वरील संकटे दूर जातात, आणि पतीला दिर्घआयुष्य लाभते. या व्रताने वैवाहिक जीवनातील अडीअडचणी ही दूर होतात.प्रत्येक विवाहित महिलेच्या आयुष्यात वटपौर्णिमा सणाचे एक वेगळेच महत्त्व असते. वटपौर्णिमे निमित्त हा आनंद दुगना होण्यासाठी मॅक्सवुमन आणि नारायणी तर्फे "साडी तुमच्या आवडीची" स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांचा बक्षीस वितरण आज १४ सप्टेंबर सायंकाळी ४ वाजता "दि सिल्क स्टुडिओ सीझन्स मॉलमध्ये" होणार असून याद्वारे महिलांना नवी उमीद जागण्यासाठी आणि वटपूजनाचे महत्व समजण्यासाठीही स्पर्धा घेण्यात आली होती.