हिंगणघाट: आरोपीवरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा मंत्री यशोमती ठाकूर यांची मागणी

Update: 2020-02-05 12:01 GMT

वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबदमधील घटनेवरुन संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या दोन्ही घटनांमध्ये जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुणाने शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये महिला ९५ टक्के भाजल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दोन्ही घटनांवरुन संताप व्यक्त करत

“या सर्व घटनांकडे पाहूण समाजामध्ये विकृती पसरली आहे याचं जिवंत उदाहरण दिसत आहे. या दोन्ही घटनांमध्ये असलेल्या मुलांना फाशी मिळालीच पाहिजे आमच्या सरकारने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या असून हा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे सुरू करून लवकरात लवकर नियोजन केले जाईल, महिला सुरक्षित राहण्यासाठी दामिनी पथक अश्या गटांची गरज आहे. त्याचबरोबर ज्या महिला शांत राहतात आणि अश्या घटना सांगत नाही त्यांनी देखील या घटना समोर आणल्या पाहिजेत अशा घटना रोखण्यासाठी आता मार्ग बदलण्याची गरज”

असल्याचे मत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.

https://youtu.be/9il-nbhiDkE

 

 

 

Similar News