निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. गुरुतुल्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या शरद पवारांच्या मार्गदर्शनामुळे माझा प्रवास विजयाकडेच जाईल असा विश्वास उर्मिलाने व्यक्त केला.
गुरुवारी सकाळी उर्मिला मातोंडकरने शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी ऊर्मिलासोबत तिचा पती मोहसीन आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास अर्धा तास उर्मिला यांची पवारांशी चर्चा सुरु होती. माझ्या लढ्याला बळकटी दिल्याबद्दल शरद पवार यांचे आभार मानल्याचं उर्मिलाने सांगितले.
https://twitter.com/OfficialUrmila/status/1116194717123977216