गेल्या आठ दिवसांपासून पाण्यात बुडलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था अजूनही गंभीर आहे. सध्या विविध संस्था, दानशूर व्यक्ती. सेवाभावी संस्था, राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील लोक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अशात पूरग्रस्तांसाठी मदत करावी असे आवाहान बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केले आहे. येणार स्वातंत्रदिन पूरग्रस्तांसाठी साजरा करावा, तुमच्याकडून होईल ती मदत करावी असे आवाहन उर्मिलाने एका व्हिडिओद्वारे केले आहे.
https://youtu.be/0Zfp5XtlSAE