राज्यावर एकामागोमाग संकटाचा मारा होतो आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन, त्यानंतर टोळधाड, त्यात आता निसर्ग चक्रीवादळाचा सामना राज्याने केलाय. या संकटकाळात सरकारची भुमिका महत्तवपुर्ण राहिली आहे. सर्व प्रकारच्या संकटांवर मात करण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पार पाडत आहेत. यावर भुमाता ब्रीगेड्च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना ‘संकटमोचन मुख्यमंत्री’ म्हणून ओळखले जाईल असं मत फेसबुक लाइव्ह माध्यामातून व्यक्त केलं आहे.
तृप्ती देसाई यांनी म्हटलंय की,
उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनतर कोरोना विषाणू पसरला , चक्री वादळ आले , टोळधाड आली पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री परिस्तिथी चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच या सर्व संकटातून आपण बाहेर पडलो तर आवर्जून संकटमोचन म्हणून उद्धवजी ठाकरे याना ओळखले जाईल.