कोरोनाच्या भयंकर परिस्थिती शिक्षणमंत्री (Uday Samant) उदय सामंत यांचे आजचे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत परीक्षा होणारच हे खुपच धक्कादायक आहे यांच्या या वक्तव्याने माणुसकी आहे की नाही याबद्दल विचार करावा लागेल .. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे कौतुक करावे वाटते त्यांनी योग्य व विद्यार्थ्यांनच्या हिताचा निर्णय घेतला .
अनेक विद्यार्थ्यांना च्या घरी कोरोनामुळे भीतीचे वातावरण चालू आहे ,कोणाच्या घरी आई कोरोना पोजिटिव्ह आहे , तर कोणाच्या घरी बाबा, तर कोणाच्या दोघेही ,काही च्या घरी तर व्यक्ती मृत्यू पावला , अशा मध्ये घरात खायला अन्नाचा कण देखील नाही काही घर तर पाण्यावर आपलं पोट भरत आहे असे विद्यार्थी भारती राज्यद्याक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले .
(Uday Samant) उदय सामंत यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून द्रोणाचार्य बनू नये विद्यार्थ्यांनच्या हिताचा विचार करावा असे राज्यउपाध्यक्ष रत्नदीप आठवले यांनी सांगितले.
हे ही वाचा | 9 वी आणि 11 वी च्या परीक्षांसह दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द – वर्षा गायकवाड
एका बाजूला मा मुख्यमंत्री साहेब जनतेला बळ देण्याचे काम करत आहे जीवन मारणारच्या ह्या युद्धांत आपल्याला कसे ठिकून राहायचे आहे हे सांगतात आहे लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना सहकार्य उदय सामंत यांनी केले पाहिजे असे राज्य कार्यध्यक्ष प्रणय घरत यांनी सांगितले .
आपल्या आजूबाजूला भयावह वातावरण आहे , ही अनेक मुले लोकांच्या मदतीला धावून जात आहेत , त्यांच्या अडचणी सोडवण्यास मदत करत आहेत , जवळचे मरणाच्या दारात असताना , त्यांना त्यांची गरज असताना यांनी परीक्षा द्यावी असे जर उदय सामंत म्हणत असतील तर ते निर्दयी आहेत असे राज्यकार्यवाह श्रेया निकाळजे यांनी म्हटले
हे ही वाचा | Lockdowneffects- चार भिंतीमधले… वाद मिटले, संवाद थांबले…
अनेक महाविद्यालयात ऑनलाईन पध्दतीने परिक्षा , लेक्चर , प्रोजेक्ट चालू आहे ते देखील लगेच च्या लगेच बंद करण्यात यावे असे राज्य संघटक शुभम राऊत यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांना च्या हिताचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्र्यांनी बळ दिले पाहिजे तसेच मुख्यमंत्री साहेब तुम्ही स्वतः या मध्ये लक्ष घालावे असे राज्यप्रवक्ता अर्जुन बनसोडे यांनी सांगितले.
तरी शँभर वर्षात पहिल्यांदा आलेली अपवादात्मक परिस्थिती शिक्षणमंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या भूमीकेतून समजूनने घेऊन विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टर च्या गुणपत्रिकेच्या आधारे सरसकट पास करण्यात यावे अन्यथा विद्यार्थी भारती परिक्षा वर बहिष्कार टाकेल असे असे मंजिरी धुरी यांनी सांगितले असल्याचे राज्य सचिव जितेश पाटील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे .
मंजिरी धुरी