भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. तृप्ती देसाई यांनी आजपर्यंत अनेक आंदोलन केली त्यापैकी एक म्हणजे शबरीमाला. आज झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनवाईत पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठ सुपुर्त करण्याचा निर्णय दिला आहे. याबाबत तृप्ती देसाई यांनी व्हिडीओ मार्फत आपले मत मांडले आहे.
तृप्ती देसाई यांनी म्हटलं की, “सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाचं मी स्वागत करते आणि सर्व जाती आणि धर्माच्या महिलांना या मंदीरात प्रवेश मिळावा याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मी विनंती करते. तसेच १७ नोव्हेंबरला सर्व महिलांना मंदीरात प्रवेश मिळेलंच तेव्हा केरळच्या सरकारला माझी एवढीच विनंती की त्यांनी महिलांना सुरक्षीततेने मंदीरात पोहचवावे.”