राज्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरात राहणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सगळ्या घरातले बीग बॉस आहेत त्यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचं पालन करण्याची आवश्यकता आहे. असं आवाहन भुमाता ब्रीगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी नागरिकांना केलं आहे.
संबंधित बातम्या...
- CoronaVirus: 'या' आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ११ महत्त्वपुर्ण सूचना
- कोरोना विरुद्ध लढण्यासाठी जनतेने सहकार्य करावं- उद्धव ठाकरे
- राज्यात कोरोना बाधितांची आजची संख्या ९७
“राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करतंय. राज्य सरकार जे जे आदेश देत आहे ते आपण सर्वांनी पाळले पाहिजेत. ते आपल्या स्वत:च्या रक्षणासाठी आहेत एवढं लक्षात घ्या आणि कोरोनाला आपल्या राज्याच्या हद्दपार करण्यासाठी सहकार्य करा.”अशी सूचना यावेळी त्यांनी दिलीय.
सध्या उद्ववजी ठाकरे आपल्या सर्वांना घरी राहण्याचं आवाहन करतायत आणि ते सगळ्या घरातले आता बीग बॉस आहेत. त्यामुळे बीग बॉस जसं सांगतील तसं सगळ्यांनी एकणं गरजेचं आहे. ३१ मार्चपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा ते सांगतील तशी अंमलबजावणी केली तर निश्चितच आपल्या राज्यातून आणि देशातून कोरोना हद्दपार होऊ शकतो. असं आवाहन तृप्ती देसाई यांनी केलंय.
https://youtu.be/fKkAnHTgi0g