दिल्ली बलात्कार प्रकरणातील दोषींना आज सकाळी फाशी देण्यात आली या निमित्ताने बोलताना, “निर्भयाच्या चारही आरोपींना फासावर लटकवलं गेलंय. आज सुवर्णदिन असून न्यायाचा दिवस आहे. हा न्याय फक्त निर्भयाला मिळाला नसून ज्या लाखो निर्भया न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. सत्य परेशान हो सकता हे लेकीन पराजीत नही” अशी भावना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे.