देशभरात सध्या लॉकडाऊन सुरु आहे आणि २१ days lock down सुरु असताना सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. कोणी गरिब व्यक्ती जर अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर गेली असेल तरी त्याला पोलिसांचा चोप मिळाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असा परिस्थितीत अतिश्रीमंत वाधवान कुटूंब हे गृहमंत्रालयाचा पास घेत आणि महाबळेश्वर पर्यंत पोहोचतं यावर भुमाता ब्रीगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी सरकारचा तीव्र विरोध दर्शवताना अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा...
- अमिताभ गुप्तांना बनवलं बळीचा बकरा- रविना टंडन
- लॉकडाउन मध्ये तृप्ती देसाईंना दारु खरेदी करताना अटक?
- आज मराठा समाजात जन्मल्याची खंत वाटते- तृप्ती देसाई
"वाधवान प्रकरण नागरिकांच्या समोर आल्यानंतर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जात. इथं वाधवान कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला जातो. त्यांच्या गाड्या जप्त केल्या जातात. (Wadhwan Family Caught In Mahabaleshwar During Lockdown) पण ज्या अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जात त्यांची नार्को टेस्ट घ्या जेणेकरुन कोणत्या मंत्र्यांनी हे लेटर द्यायला लावलं हे समोर येईल." असं मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलंय.
सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि श्रीमंताना वेगळा न्याय मिळत असेल तर तो राज्यघटनेचा आणि कायद्याचा अपमान आहे. सर्वसामान्य माणुस हे अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे तातडीने ज्यांनी कुणी पत्र दिलं त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे.
वाधवान प्रकरण बाहेर आलं आहे परंतु अशा अशा कित्येक श्रीमंत कुटुंबांना गृह मंत्रालयातून व्हीआयपी पास दिले गेले आहेत? याची चौकशी झाली पाहिजे आणि ते सुद्धा सर्वांसमोर येणं गरजेचं आहे.
सरकारच्या अनेक चांगल्या गोष्टींचे आम्ही समर्थन आणि स्वागत केले आहे परंतु सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर बोललेच पाहिजे. अन्यथा यापुढे "श्रीमंतांनाच न्याय मिळत राहील आणि गरिबांवरील अन्याय वाढतच जाईल.' अशी भुमिका यावेळी तृप्ती देसाई यांनी घेतलीय.
- तृप्ती देसाई (संस्थापक अध्यक्षा- भूमाता ब्रिगेड)
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/1342883205913311/