खरा राष्ट्रवाद म्हणजे लोकांबद्दल असलेले आणि देशांप्रती असलेले प्रेम होय, मात्र भाजप जे काही करते त्यामधून प्रेम दिसून येत नाही असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी सांगितले. दरम्यान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना देशाचा आवाज हा एकाच नेत्याने दाबला जात असून खऱ्या मुद्यांबाबत सरकार बोलत नसल्याचा शाब्दिक निशाणा साधत त्यांच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेवर कडाडून टीका केली आहे .राष्ट्रवाद म्हणजे नरेंद्र मोदी किंवा सध्याचं सरकार जे करतं ते नसून राष्ट्रवाद म्हणजे इथल्या लोकांवरचं प्रेम अशी छोटीशी व्याख्या प्रियांका गांधी यांनी केली. प्रियांका गांधी सध्या अमेठी व रायबरेली दोन महत्व्याच्या जागांवर प्रचार करत आहेत.
प्रियांका गांधींकडे उत्तर प्रदेश ची जबाबदारी असून ४१ जागांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यातील अमेठी आणि रायबरेली या सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रतिनिधित्व करतात. नरेंद्र मोदींच सरकार नेते लोकांचा आवाज दाबतोय आणि लोकांच्या मनात किती राग आहे हे २३ मे लाच कळेल असंही प्रियंका गांधी यांनी पुढे सांगितले.