बंद पेटीतला त्रास

Update: 2019-11-15 12:06 GMT

अनेकदा महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबले जातात. पण त्या सर्वच उपक्रमांना यश मिळतं असं नाही. महिला काही वेळा स्वत:हून पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांची तक्रार करू शकत नाहीत. त्यामुळे स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांवर आळा बसावण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये तात्कालीन पोलिस निरीक्षक उत्तमराव जाधव यांच्या नेतृत्त्वांतर्गत संपूर्ण शहरातील कॉलेज समोर, बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षेसाठी तक्रार पेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांची बदली झाली आणि या शहराची परिस्थिती बदलली. याबाबतची तक्रार स्थानिक विद्यार्थींनी आणि नागरिकांनी केली आहे.

या तक्रार पेटीत मुली आपलं नाव गुप्त ठेवून त्रास देणाऱ्या व्यक्तीची तक्रार लिहून ठेवत होत्या. त्यामुळे पोलिस अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवत होते. आठवड्यातून एकदा ही तक्रारपेटी उघडून पोलीस त्याची शहानिशा करून महिलांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करत होते. मात्र ठाणेदार जाधव यांची बदली झाल्यानंतर त्या तक्रार पेट्यांकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे स्त्रियांना होणारा त्रास हा बंद पेटीतचं बंधिस्त झाला आणि शहरात रोमिओंचा मोठ्या प्रमाणावर मुलींना व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर नगरसेविका भाग्यश्री मानकर यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांनींसाठी उत्तमराव जाधव यांनी सुरू केलेला उपक्रम लवकरात लवकर पुन्हा सुरू करून पोलीस विभागाने याबतीत विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.<Full View/h3>

Similar News