कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर रोजी पुण्यातील एस. पी. कॉलेज मध्ये सभा घेणार आहेत.
सभेसाठी महाविद्यालयाच्या मैदानावरची झाडं तोडली गेली आहेत. यासंबंधी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना याबाबत विचारलं असता मोदींच्या सभेसाठी आम्ही झाडं कापली नाहीत फक्त फांद्याच कापल्यात, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव ही झाडं कापली जात असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी परवानगीदेखील घेण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.