२२ डिसेंबर ही वर्षातील सर्वात मोठी रात्र म्हणून ओळखली जाते. दिव्य मराठी'ने रविवारी (२२ डिसेंबर) रात्री ९ वाजता महाराष्ट्रातील २२ शहरांत एकाच दिवशी महिला घराबाहेर पडून, ‘नाइट वॉक' ची संकल्पना महाराष्ट्रभर राबवली. "दिव्य मराठी'च्या "मौन सोडू, चला बोलू' अभियानाचा टप्पा आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र्राबरोबर पुण्यात देखील चांगला प्रतिसाद मिळाला.या नाईटवॉक'ला आम्ही तर येणारच, आमच्या मैत्रिणी व परिवारालाही घेऊन येण्याचा निर्धार महिलांनी केला असून सर्व शहरात स्त्री शक्ती दिसून आली. यामध्ये गृहिणी, प्राध्यापिका, डॉक्टर, वकील, उद्योजिका व अधिकारी सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्रातील ओरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, नगर, पुणे, सातारा, सांगली, मुंबई, बीड, जालना, उस्मानाबाद, जालना, माजलगाव, चाळीसगाव, धुळे, भुसावळ, मालेगाव, सिन्नर, यवतमाळ, बुलडाणा, देऊळगाव राजा या शहरासह अनेक ठिकाणी महिलांनी नाईटवॉक साठी पुढाकार घेतला आहे.
पुण्यामध्ये 'नाइट वॉक'ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई, मनसे महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा आणि मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासह प्रत्येक शहरातील नगराध्यक्ष, विविध संस्थांचे प्रमुख, अधिकारी या उपक्रमात सहभागी होते.
https://youtu.be/YHG2cfWJ6JE