राज्यात काल रात्री(मंगळवारी)पर्यंत ८ रुग्णांची नोंद झाली असून एका दिवसात २३ कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापैकी ११ जण मुंबईतील तर पुणे, ठाणे, वसई, विरार आणि नवी मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तसेच सांगलीत ४ आणि साताऱ्यात १ रुग्ण आहे. राज्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या ९७ झालीय.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदीसह सीमाबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसंच जिल्ह्यांच्या सीमादेखील आपण बंद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याशिवाय खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
राज्यातील रुग्णांचा तपशील
पिंपरी चिंचवड १२
पुणे मनपा १६
मुंबई ३५
नवी मुंबई ५
नागपूर, यवतमाळ, कल्याण प्रत्येकी ४
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी २
पनवेल, उल्हासनगर,
औरंगाबाद, रत्नागिरी, वसई -विरार प्रत्येकी १
एकूण रुग्ण ८९ , मृत्यू २