साकळाई पाणी योजनेसाठी अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दिपाली सय्यद यांनी मागे घेतलं. ३५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी त्या आमरण उपोषणाला बसल्या होत्या. त्यांच्या या उपोषणाला कलाकारांनी पाठिंबा दर्शवून अभिनेत्री मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर यांनी पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर दीपाली सय्यद यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे. तर २ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला आहे. गेल्या २ महिन्यापासून दीपाली सय्यद साकळाई पाणी योजनेसाठी लढा देत आहेत. यामधून लागभग ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
https://www.instagram.com/p/B1DOCInBrfC/?utm_source=ig_web_copy_link