महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रेच्या समारोपावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मोदी सरकार वर त्यांनी सडकून टीका केली.
मागील 5 वर्षात जे झालं ते महात्मा गांधी यांनी आज पाहिलं असतं तर त्यांनाही दुःख झालं असतं, आज बेरोजगारी वाढली आहे, स्त्रियां सुरक्षित नाहीत. साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करून सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्यांना गांधींची मूल्ये काय कळणार? अशा भाषेत त्यांनी खडेबोल सुनावले.
त्याचबरोबर RSS ला देशाचं प्रतीक बनवू पाहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर ही त्यांनी टीका केली. देश गांधीजींच्या विचारावर उभा आहे. अन् देश कधीच त्यांच्या तत्वांना, विचारसरणीला विसरणार नाही, सत्तेसाठी काहीही करणाऱ्या लोकांना अहिंसेचं महत्त्व काय कळणार? असं म्हणत सोनिया गांधी यांनी भाजप च्या एकूण कार्य शैलीवर तिखट शब्दात टीका केली.