डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या महिला डॉक्टर्सना तातडीनं अटक करा, त्यांची वैद्यकीय सेवेची नोंदणी रद्द करा आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या, अशी मागणी पायलची आई अबिदा यांनी केलीय. पायलला न्याय मिळेपर्यंत नायर रूग्णालयातून जाणार नाही, अशी भूमिका अबिदा यांनी घेतलीय. संबंधित डॉक्टर्सविरोधात गुन्हा दाखल झाला तरी अद्याप तपासाला अपेक्षित गती मिळाली नाही, याबद्दल अबिदा यांनी नाराजी व्यक्त केलीय. तर सातत्यानं वरिष्ठांकडे तक्रारी करूनही पायलचं म्हणणं ऐकून न घेतल्याचा पुनरूच्चार अबिदा तडवी यांनी केलाय.
जातीवादाला निर्बंध घालणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही – अँड. नितीन सातपुते
नायर रूग्णालयातील प्रशासनानं डॉ. पायल यांच्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या तीनही डॉक्टर्सना पळून जाण्यात मदत केली आहे. त्यामुळं याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार आहोत. शिवाय जादीवादाला निर्बंध घालण्यासाठीच्या कायद्याची अंमलबजावणीच नीट होत नाहीये. मुंबईत आजही अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये जातीवाद सुरू आहे. डॉ. पायल आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.