दहावीचे वर्ष माझ्यासाठी थोडीशी खुशी थोडासा गम यामध्येच गेलं याचं कारणही तसचं होतं कारण इयत्ता दहावी पर्यंत अभ्यास करण हे कधी कळालच नाही आणि त्यामुळेच दहावीमध्ये नापास झाल्याचा शिक्का कपाळी लागलेलं मार्क लिस्ट माझ्या नशिबी आलं आणि सुरवात झाली नवीन स्वप्नाची नवीन सुरवात पुढे जाऊन पुन्हा अभ्यास करेल आणि आपलं शिक्षण पूर्ण करेल असं कधी स्वप्नात ही आलं नव्हतं परंतु शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं म्हटलं जातं यात काहीच खोटं नाही आणि ते ही पुढच्या काही दिवसात पदो पदी दिसत गेलं त्याला कारणही तसंच होत दहावी नापास, तुला शिकायचे नाहीना तर नको शिकू आत्ता लागा काम धंद्याला असं म्हणून घरच्यांनी वडिलोपार्जित फॅब्रिकेशनच्या शॉप वर काम करायला लावलं. आणि जसं काम करताना वेल्डिंग शिकत गेलो तस शिक्षणाचे महत्त्व लक्षात येत गेले पुढे रोजचं डोळे टोमॅटोवाणी लाल भडक होऊ लागले (वेल्डिंग करताना) आणि शिक्षण किती महत्वाचे असते हे त्या लाल डोळ्यासमोर दिसू लागले त्यानंतर आपोआपच शिक्षणाकडे वळलो आणि कधी ऑक्टोबर महिना येतोय आणि मी पेपर देतोय अस झालेलं.
एवढं करून नापास ही पदवी पदोपदी आपल्या जवळच्या लोकांच्या तोंडातून आग ओकावी तशी ओकली जात होती त्यामुळेच अभ्यास करून पास होणे हे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते आणि कसा बसा ऑक्टोबर महिना उजडला आणि मी या परीक्षेत पास झालो. त्यानंतर शिक्षण जे सुरू केलं ते आज तागायत शिक्षण बंद केलंच नाही
आज दहावीचं नाहीतर बारावी, बीकॉम आणि जर्नालिझम पूर्ण केलंय आणि लॉ च शिक्षण सध्या घेत आहे त्यामुळेच अपयशी होणे म्हणजे सर्व संपलं असंही नाही उलट अपयशामधून मोठ्या जोमाने आपण शिकू शकतो आणि उंच भरारी घेऊ शकतो