मत आणि मतदान या शब्दाला काहीच अर्थ उरला नाही - अंजली दमानिया

Update: 2019-11-23 07:27 GMT

राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना तसेच शिवसेना(Shivsena) -राष्ट्रवादी-काँग्रेस यांचं सरकार स्थापन होणार असताना आज राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. तर देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली यावरून अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाली.

हा देशातील सर्वात मोठा ड्रामा असल्याचं बोललं जातंय. यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मॅक्सवुमन जवळ बोलताना अतिशय दुःख आणि राग येतोय मत आणि मतदान या शब्दाला काहीच अर्थ उरला नाही हे अतिशय घाणीचे राजकारण चाललेलं आहे,आता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याशिवाय काहीही उरलेलं नाही, ही लोकशाही म्हणताच येणार नाही अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे.

Full View

Similar News