काँग्रेस नेते हर्षवर्धन पटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी राजकारणात दमदार एन्ट्री घेतली आहे. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत त्यांनी 17 हजार 274 मतांनी विजय मिळवला आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर आता त्यांच्या कन्या निवडून आल्या आहेत. 23 जूनला इथे मतदान घेण्यात आलं होतं. अंकिता यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता.
अंकिता यांचं शिक्षण परदेशात झालेलं आहे. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसंच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. अंकित पाटील यांच्या रूपाने पाटील घराण्यातील तिसरी पीढी राजकारणात आली आहे.