एकविसाव्या शतकात वावरत असताणाही ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा नारा आजही तितक्याच आक्रोशाने द्यावा लागेल अशी घटना नाशिक येथील शिंदे गावात घडली आहे. मुलीने वडीलांकडे पाठ्यपुस्तकाची मागणी केली असता, वडीलांनी चक्क आपल्या पोटच्या पोरीच्या तोंडात कीटकनाशकाची बाटली कोंबुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे बाप-लेकीच्या नात्याला काळींबा पुसला गेलाय.
एकीकडे मुलांचे शिक्षण सुरळीत व्हावे तसेच ते उच्च जीवनात यशस्वी व्हवेत यासाठी झटणारे पालक असताना, काही पालक आजही मुलींच्या शिक्षणांसाठी नकार देतात, या गोष्टीचीच मुळी कीव येते. या घटने संधर्भात नाशिक रोड पोलिस ठाण्यात मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रर्कनि वडीलांवर (पंढरीनाथ बाबुराव बोराडे.) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाशिक ते पुणे या महामार्गावरील शिंदे गाव येथे झाली. घटना घडली त्या क्षणी मुलीची आई घरात नव्हती, मुलीने तिच्या वडीलांकडे शेक्षणिक साहित्याची मागणी केली असता संतापलेल्या मध्यपी बापाने मुलीला मारहाण करण्यास सुरवात केली तसेच गोठ्यातील कीटकनाशकाची भरलेली बाटली तीच्या तोंडात ओतण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटने बद्दल नाशिकरोड पोलिस ठाण्यात वडीलांविरुध्द मुलाने फिर्याद केली आहे. तसेच घटने संदर्भातील सर्व माहिती मुलीच्या भावाने पोलिसांना दिली आहे.
शिंदे गावच्या ह्या घटने बाबत सर्वत्रच तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण या घटनेमुळे मुलींच्या शिक्षणाबाबतचा निकाळजीपणा पुन्हा एकदा समाजा समोर उभा राहीला आहे.