अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सुरवाडी खुर्द येथे, तिवसा विधानसभा मतदार संघाच्या आमदार, यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नातून साकार झालेले तालुका क्रीडा संकुलाचा काल थाटात लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्याला अनेक दिग्गजांसह क्रिकेटपटू केदार जाधव यांनी देखील उपस्थिती दाखवली त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली.
महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार तालुकास्तरीय क्रीडा संकुल निर्मित करून जनतेला व्यायाम, स्विमिंग, खेळ, ब्याटमिंटन, हॉलीबॉलसह अन्य सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने शासनाने कोटींचा खर्च करून तिवसा येथे क्रीडा संकुल उभारले. हे क्रीडा संकुल आता सोमवारपासून खेळाडूसाठी खुले होणार आहे.