अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ दिल्लीतील शाळेला भेट देणार; केजरीवालांना निमंत्रण नाही

Update: 2020-02-22 13:49 GMT

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते अहमदाबादसह आग्रा आणि दिल्ली शहरांना भेटी देणार आहेत. ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प (Milania Trump) या दिल्लीतील एका शाळेत ‘हॅपिनेस क्लास’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arwind Kejariwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) हे उपस्थित रहाणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. केंद्र सरकारने केजरीवाल आणि सिसोदिया यांची नावं निमंत्रण यादीतून वगळल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.

दिल्लीतील शाळा या राज्य सरकारच्या अखत्यारित येतात. राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शासकीय कार्यक्रमांचं निमंत्रण द्यावं लागतं. मात्र, ते न दिल्याचा ‘आप’ (AAP) चा आरोप आहे. प्रशासनाकडून मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतंही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

Similar News