थायलैंड चे राजा वजिरालॉन्गकोर्न (66) यांनी आपल्या राज्याभिषेकच्या ३ दिवसापूर्वी सुरक्षारक्षक सुथिदा तिजाई (40) यांच्यासोबत विवाह केलं. याबद्दल अधिकृत माहिती राजमहल कडून बुधवारी देण्यात आली असून सुथिदा तिजाई यांना राणीचा दर्जा देण्यात आला आहे. वजिरालॉन्गकोर्न यांच्या वडिलांचे 2016 मध्ये निधन झाले . त्यामुळे अधीकृतपणे त्यांचा राज्याभिषेक झाला नाही. वजिरालॉन्गकोर्न राजांनी याआधी ३ विवाह करून त्यांना ७ मुलं आहेत. थाई टीवी चॅनलवर त्यांच्या विवाहाचा व्हिडीओ प्रसारित केला गेला आहे. सुथिदा यापूर्वी थाई एयरवेज मध्ये फ्लाइट अटेंडेंट होत्या. 2017 पासून ते पर्सनल बॉडीगार्ड म्हणून काम पाहत होते.