तरुण मुली गायब !

Update: 2020-01-22 09:22 GMT

बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात एका वर्षात 556 मुली बेपत्ता झाल्याची माहिती उघडकीस आली. यामध्ये १८ ते २५ वयोगटातील मुलींचे प्रमाण जास्त आहे. याआधी बुलडाणा जिल्ह्यात 2019 मध्ये अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. यामध्ये 18 वर्षाच्या आतील मुलींचा विचार केला तर 84 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तर 18 ते 25 वयोगटातील 472 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. आणि या सर्व तक्रारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये 431 प्रकरणांचे निवारण झाले असून अजूनही 125 मुली बेपत्ता असल्याचे पोलिसांकडून बोलले जात आहे. या सर्व तक्रारींचा आढावा घेतला असता मुलींना फसवून नेण्यात आल्याचा प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पालकच नव्हे तर सर्वांसाठीच हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर सोशल मिडियाचेही प्रमाण तरुण मुलींमध्ये वाढल्यामुळे अशा तक्रारी वाढत चालल्या आहेत.

https://youtu.be/DGcYxbwTJdA

 

-निखिल शाह, बुलडाणा

Similar News